Breaking News

सुस्वागतंम आपले वेबसाईट वर स्वागत आहे.....

ऊस तोडी मुलांचे सर्वेक्षण ( माझे लेखन)


ऊस तोडी मुलांचे जीवन



२४/१२/२०१६  या तारखेला केलेले  सर्वेक्षण .


     पाटखळमाथा या गावच्या रस्त्याच्या दुतर्फा या दिवसात खूप टोळ्या येतात.त्यांचे सर्व्हेक्षण वासोळे शाळेला दरवर्षी करावे लागते.

       टोळीचा सुगावा लागला होता.आज शनिवार असल्यामुळे शिंगटे मॕडम आणि मी सकाळीच टोळीला भेट दिली.सकाळी माणसे भेटतील या हिशोबाने.बायकांची आवराआवर चाललेली,पुरूष मंडळी सहाच्या सुमारास कामाला.छोटी मुले पाहून चक्रावून गेलो.ही मुले शाळेत कशी आणायची.

          मुलांना एका ठिकाणी गोळा केले.शिंगटे मॕडमनी मुलांची नावे लिहिली.ती मुले त्यांच्या गावी शाळेत जात होती.ती इयत्ता त्यांनी सांगितली.दोघीनी पर्समध्ये हात घातला हाताला जेवढी चॉकलेट सापडतील तेवढी बाहेर काढली आणि मुलांना दिली.

        मुलांना एकत्र बसवून घेतले त्यांच्याशी गप्पागोष्टी केल्या.एका मुलीनी खूप छान वाचून दाखवले.शिंगटे मॕडनी मुलांना छान गोष्टी सांगितल्या.त्यांना शाळेत येण्यास सांगितले.तेव्हा मुले विचार न करता बोलली मॕडम काम कोण करणार?या छोटीला कोण संभाळणार?या कोपीतील साहित्यावर,शेरडांनवर कोण लक्ष ठेवणार?बापरे! केवढी जबाबदारी या मुलांनवर!ही मुले १ ते ५ वीच्या इयत्ता मधील होती.

          मुले गोळा करताना निरीक्षण केले असता.ही चिमुकली मुले किती कामे करत होती.पाणी भरणे,धुणंभांडी, साहित्य लावणे.जळणगोळा करणे,एक छोटा मुलगा तर आपल्या लहान भावाला कडेवर घेऊन हातात मोबाईलवर गाणी ऐकत गरागरा फिरत होता.मुले जबाबदाऱ्या सहज उचलत होते.पण पालक.......,

        शाळेत पाठवण्यासाठी विनंती केली.शाळेत मुलांना कपडे,वही,पुस्तके ,खाऊ,जेवण देऊ सांगितले.पण पालक ,अहो मॕडम या पोराच्या बापाला काम होत नाही.तो ऊस पटापटा तोडतो.काय करणार कष्ट आमच्या आयुष्याला पुजले आहे.अहो मुलांना शाळेत पाठवा त्यांच्या वाटेला नको असले दिवस.त्यांना कळत पण वळत अजिबात नाही.शाळेत जाऊन पैसे मिळणार काय?उलट काम करायला लाज वाटेल.या पालकांचे कसे खोलवर प्रबोधन करावे.कारण त्यांना वेळ नसतो.कामावर जाण्याची घाई शिवाय ही लोक बीड,उस्मानाबाद,धुळे या जिल्ह्यातून आलेली.आम्हाला कटविण्यासाठी सांगतात.मॕडम पाठवतो शाळेत.

          या निरागस मुलांनकडे पाहिले की वाटते,किती लहान वयात यांच्यावर जबाबदारी पडलेली आहे,अवेळीच प्रौढ झालेली आहेत .

        या पालकांची मानसिकता कधी बदलणार या मुलांच्या बालपणावर आपण किती अन्याय करतो.यांचे खेळण्याचे,बागडण्याचे,शिकण्याचे वय आहे.आपल्या जबाबदाऱ्या संभाळण्यासाठी ही मुले नाहीत.या मुलांना ही जाणीव नाही,की आपले बालपण कोमेजून जात आहे.हीच पिढी मोठी होती आणि आपल्या मुलांनकडून हीच अपेक्षा ठेवतात.कधी यांना जाणीव होणार बालपण हे जबाबदारीचे ओझे सांभळायचे नाहीतर,स्वतः चा विकास घडवायचा आहे! पालकांचे विचार बदले तरच या मुलांचे हरविलेले बालपण गवसणार आहे.

       खरेतर शासकीय पातळीवर काही हालचाली झाल्या किंवा बंधने लादली,जशी नोटबंदी,बँकेत खाती काढणे,कॕशलेस व्यवहार तर या मुलांच्या शिक्षणाबाबत काही शासकीय पातळीवर पाऊल उचले गेले तर त्यांना स्वर्ग दोनच बोटे शिल्लक राहिल,असे आज तरी आम्हाला वाटते.पाहू आमच्या स्तरावर शक्य तितके प्रयत्न करतो.परंतु ते तोकडे पडतात असे आम्हाला राहून राहून वाटते.

        तो सुदिन कधी येईल आणि एकही मुलं घरी (शाळाबाह्य) राहणार नाही.तो येणारा काळ आणि वेळच ठरवेल.

जय शिक्षण ! जय संगोपन ! जय बालकांचा विकास तोच भारताचा विकास !


              सविता बारंगळे

वासोळे शाळा.ता.जि.सातारा





7 comments:

  1. खूप छान आणि वास्तववादी लेखन

    ReplyDelete
  2. 👌👌👌सारे शिकूया पुढे जाऊया.

    ReplyDelete
  3. मडम आपल्यासारख्या प्रयत्नशील शिक्षकांच्या प्रयत्नांमुळे कितीतरी मुले शिक्षणाच्या प्रवासात येतील आणि विकासाची कास धरतील,यात शंकाच नाही.आपल्या प्रयत्नांना मनापासून शुभेच्छा.

    ReplyDelete
  4. 👌👌👌👌ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाबद्दलचे आपण मांडलेले विचार अतिशय मार्मिक असून सर्वांना विचार करण्यास प्रवृत्त करणारे आहेत.

    ReplyDelete
  5. अतिशय मार्मिक लेखन.खरे व वास्तववादी चित्र आपण या लेखातून दाखवून दिले.आपले मनःपूर्वक अभिनंदन

    ReplyDelete
  6. Savita Tujhe kam Khoob Shaan aahe keep it up to Ek Adarsh Shikshak aahes congratulations

    ReplyDelete
  7. खूप छान.आपल्या प्रयत्नांना मनापासून शुभेच्छा.

    ReplyDelete