*नाविन्यपूर्ण उपक्रम* *बिनखर्चाचे ठिबकसिंचन* (माझे लेखन )
*नाविन्यपूर्ण उपक्रम* *बिनखर्चाचे ठिबकसिंचन*💦
वासोळे शाळा मार्च २०१७
आज आपण खूपजणांच्या तोंडून झाडाविषयी ऐकत असतो.झाडे लावा झाडे जगवा.आपली गाडी लावायला एखादे झाड शोधत असतो.रखरखत्या उन्हात माणसांना थंडगार वा-याची झुळूक हवी असते.
सर्व गोष्टी निसर्गापासून हव्या असतात.आणि त्याचा अट्टाहास ही केला जातो.पण माणसे आपली जबाबदारीच विसरतात.अहो झाडे लावली तर ती जगवली पण पाहिजे ना.
याच गोष्टीचा विचार करून वासोळे शाळेत एक उपक्रम राबविला.शाळेत बालपोषण आहारातील रिकाम्या तेलाच्या बाटल्या यांचा खूप कचरा झाला होता.एवढ्या बाटल्यांचे काय करायचे ?. उन्हाळयाचे दिवस सुरू झाले होते. शाळेत खूप झाडे होती.झाडे वाचली पाहिजेत या सगळ्या गोष्टीचा विचार चालू होता.
श्री करंजे सरांनी यावर एक उपाय काढला. 5 ते 7वी ची मुले हाताशी घेऊन चारच्या सुट्टीत.सर्व बाॕटल गोळा केल्या .बाॕटलच्या तळाला छिद्रे पाडली.एक-एक बाॕटल धुरांड्याच्या बाजूला खड्डा काढून बाॕटल पुरली.त्यात पाणी ओतून झाकण लावले.झाकण असल्यामुळे बाॕटलमध्ये माती खडे पडणार नाही,शिवाय पाण्याचे बाष्पीभवन ही होणार नाही.त्या झाडांना💧💧 थेंब थेंब पाणी मिळत राहणार
*बिनखर्चाचे ठिबकसिंचन*💦
आहे का नाही 👉ही टाकावू बाॕटल खूप महत्त्वाची
चला तुम्ही ही आता कामाला लागा.
*झाडे लावा,झाडे जगवा*.🌱🌿🌳
जि.प.प्राथमिक शाळा वासोळे
शब्दांकन-- सविता बारंगळे🙏
No comments