कलेतून शिक्षण (माझे लेखन )
फुल बाजार व प्रदर्शन
3 सप्टेंबर 2019
*प्लास्टिकचा वापर टाळा
कागदी फुले वापरा*
*पर्यावरणाचा -हास टाळा*
आला गौरीगणपतीचा सण चला करू या त्यांच्या स्वागताची तयारी.यासाठी जि प शाळा धनवडेवाडी दरे बु.येथे मंगळवार दि.3सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या फुलांचा बाजार भरविण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उदघाटन केंद्रप्रमुख सौ.मालन गुजर मॕडम यांनी केले.शालेय परिसरातील महिला पालक वर्ग,तरुण मुली यांनी गर्दी करून कार्यक्रमाची शोभा वाढविली.यात फुलांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. यात शाळेला फायदा झाला.
शाळेत नियोजन करून दोन तीन दिवस दररोज एक तास फुले बनविली जात होती.शाळेतील कांचन सनगर मॕडम व सविता बारंगळे मॕडम यांनी मुलांना वेगवेगळी चार प्रकारची फुले बनविण्यास शिकविले.त्यासाठी लागणारे साहित्य क्रेप पेपर,टेंटेड पेपर,कार्डशीट,गोठीव कागद शाळेने उपलब्ध करून दिले.कात्री व गम मुलांना आणण्यास सांगितले.मुलांना सुरूवातीला वर्तमान पेपर वर फुले शिकविली.त्यामुळे कात्रीने चांगले विविध आकार कापायला येऊ लागले.मोजपट्टीचा वापर करून विविध प्रमाणात सेमीच्या पट्ट्या कापू लागले.याचा सराव नंतर रंगीत कागदावर केला.त्यामुळे सुबक आकाराची सुंदर रंगेबेरंगी फुले बनविली.शनिवारी दप्तरविना शाळा या दिवशी मुलांनी खूप फुले बनविली.फुले बनवित असताना मुले विविध आकारावर चर्चा करत होती.गोल, त्रिकोण ,शंकू ,चौकोन, आयत .मोजपट्टीचा उपयोग करून सेटीमीटर मध्ये पट्ट्या कापत होते.फुले बनविता सहज आनंदाने भूमितीचे शिक्षण घेत होते.मनात शंका आली असे विविध आकार काढायला लावले असते तर कदाचित कंटाळा आला असत. मुलांनीच सुचविले आपण ही फुले विक्रीस ठेवू या.
स्वतः सुंदर केलेल्या फुलांचा आनंद चेहऱ्यावर ओसाडून वाहत होता.आपल्या आईला आनंदाने ही फुले दाखवित होती.फुलांची किंमत कमीच होती ५-५ रूपयांची होती.फुलेच शिल्लक राहिली नाही.छान विक्री झाली.शेवटी सगळ्यांनी पैसे मोजून दिलीत.त्यामुळे विद्यार्थ्यांना पैसाचा व्यहार कळाला.प्रत्यक्ष अध्ययन अनुभव मिळाला.यात खर्च सगळा जाऊन २०५ रुपयांचा फायदा झाला.हे पैसे मुलांच्या कलेच्या विकासासाठी साहित्य आणण्यासाठी राखून ठेवण्यात आले.शालेय अभ्यासाबरोबर व्यवसाय प्रशिक्षण देणे गरजेचे आहे असे मला वाटते. गौरी गणपतीच्या सणांमध्ये नष्ट न होणाऱ्या कच-याची समस्या खूप मोठी असते.कागदी फुले असल्यामुळे आपल्या कच-याची समस्या निर्माण होणार नाही.या मुल्याची रूजवणूक लहान वयात मुलांनमध्ये झाली. कलेच्या माध्यमातून शिक्षणाचे धडे देणारा छोटासा उपक्रम मुलांना खूप काही शिकवून गेला.आमच्या या उपक्रमाला शिक्षण विस्तार अधिकारी सौ जयश्री शिंगाडे मॕडम व केंद्रप्रमुख सौ.मालन गुजर मॕडम यांनी खूप मोठी प्रेरणा दिली.व कौतुकाची शाबासकी दिली.तसेच आमचे ग्रामस्थ व शिक्षकवर्ग यांनी खूप शुभेच्छा देऊन कौतुक केले.त्यामुळे सनगर मॕडम व बारंगळे मॕडम यांना आधिकचे कार्य करण्याची बळकटी निर्माण झाली.
*शब्दांकन*
सौ.सविता संजय बारंगळे
जि.प.शाळा धनवडेवाडी दरे बु.
No comments