Breaking News

सुस्वागतंम आपले वेबसाईट वर स्वागत आहे.....

सुखदेव थापर


सुखदेव यांचा जन्म पंजाब राज्यामध्ये, १५.५.१९०७ या दिवशी झाला. भगतसिंग आणि राजगुरू यांचे सहकारी हीच सुखदेव यांची प्रमुख ओळख.


सुखदेव यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान


सुखदेव हेही हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लीकन आर्मीचे कार्यकारी सदस्य होते. त्यांच्यावर क्रांतीकारक चंद्रशेखर आजाद यांच्या विचारांचा पगडा होता. लाहोर येथे नॅशनल कॉलेजमध्ये असतांना त्यांनी भारताचा वैभवशाली इतिहास आणि जगातील क्रांतीविषयक, तसेच रशियाच्या क्रांतीविषयक साहित्याचा अभ्यास करण्यासाठी एक मंडळ स्थापन केले. भगतसिंग, कॉम्रेड रामचंद्र आणि भगवतीचरण व्होरा यांच्या सहयोगाने त्यांनी लाहोर येथे नौजवान भारत सभेची स्थापना केली. युवकांना स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्यासाठी उद्युक्त करणे, शास्त्रीय दृष्टीकोन अंगिकारणे, साम्यवादाविरुद्ध लढा देणे आणि अस्पृश्यता निवारण ही या सभेची उद्दिष्टे होती. ख्रिस्ताब्द १९२९ मध्ये कारागृहात असतांना कारागृहातील सहकार्‍यांच्या होत असलेल्या अनन्वित छळाच्या विरोधात चालू केलेल्या भू्क हरतालातही त्यांचा सहभाग होता.


स्वातंत्र्यासाठी मृत्यूलाही आनंदाने कवटाळणारे थोर क्रांतीकारक

२३ मार्च १९३१ या दिवशी लाहोरच्या मध्यवर्ती कारागृहात भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आले. हसत हसत ते मृत्यूला सामोरे गेले. या थोर देशभक्तांना त्रिवार अभिवादन !










No comments