Breaking News

सुस्वागतंम आपले वेबसाईट वर स्वागत आहे.....

शिवराम हरी राजगुरू



जन्म : २४.८.१९०८ या दिवशी महाराष्ट्र राज्यातील पुण्याजवळील खेड येथे एका देशस्थ ब्राह्मण कुटुंबात शिवराम राजगुरू याचा जन्म झाला. अचूक नेमबाजी, दांडगी स्मरणशक्ती याची त्यांना जन्मजात देणगी होती. कितीतरी ग्रंथ त्यांना मुखोद्गत होते. हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लीकन आर्मीचे ते सदस्य होते.


राजगुरू याची सहनशीलता दाखवणारे प्रसंग


प्रसंग १ : एकदा राजगुरू भट्टीतल्या निखार्‍यांवर आपल्या  क्रांतीकारी मित्रांसाठी पोळया भाजण्याचे काम करत होते. तेव्हा एका सहक्रांतीकारकाने निखार्‍यांची धग लागत असतांनाही शांतपणे पोळया भाजत असल्यामुळे त्यांची प्रशंसा केली. तेव्हा दुसर्‍या मित्राने त्याला जाणूनबुजून डिवचले आणि `त्याने कारागृहात गेल्यावर तेथे होणारा भयंकर छळ सहन केला, तरच मला कौतुक वाटेल’, असे म्हटले. आपल्या सहनशीलतेविषयी घेतलेल्या शंका न आवडून राजगुरूंने पोळया उलथण्याची लोखंडी सळई उन करून आपल्या उघड्या छातीला लावली. छातीवर टरटरून फोड आला. पुन्हा एकदा त्यांनी तसेच केले आणि हसत-हसत त्या मित्राला म्हणाले,“आता तरी मी कारागृहातील छळ सहन करू शकेन याची निश्चिती पटली ना ?” राजगुरूच्या सहनशीलतेविषयी शंका घेतल्याने त्या मित्राला स्वत:चीच लाज वाटली. `राजगुरू, तुझी खरी ओळख मला आता झाली’, असे सांगत त्याने राजगुरूची क्षमाही मागितली.


प्रसंग २ : कारागृहात अनन्वित छळ होऊनही राजगुरूंनी सहकार्‍यांची नावे न सांगणे : `एका फितुरामुळे राजगुरु पकडले गेले. लाहोरमध्ये त्यांचा अनन्वित छळ करण्यात आला. लाहोरच्या तीव्र उन्हाळयात चहूबाजूंनी भट्टया लावून त्यामध्ये राजगुरूंना बसवण्यात आले. मारहाण झाली. बर्फाच्या लादीवर झोपवण्यात आले. इंद्रीय पिरगळण्यात आले. कशानेही ते बधत नाहीत, हे पाहिल्यावर त्यांच्या डोक्यावरून विष्ठेच्या टोपल्या ओतण्यात आल्या. कणखर मनाच्या राजगुरूंनी हा सर्व छळ सोसला; पण सहकार्‍यांची नावे सांगितली नाहीत.


प्रसंग ३ : स्वत:च्या दु:खातही इतरांचा विचार करणारे राजगुरू : फाशी जाण्याआधी कारागृहातील एका सहकार्‍याने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना राजगुरु म्हणाले, “बाबांनो, फासावर चढताच आमचा प्रवास एका क्षणात संपेल; पण तुम्ही सगळे वेगवेगळया शिक्षांच्या प्रवासाला निघालेले. तुमचा प्रवास अनेक वर्षे खडतरपणे चालू राहील, याचे दु:ख वाटते.”


No comments