Breaking News

सुस्वागतंम आपले वेबसाईट वर स्वागत आहे.....

साताऱ्यातील प्रमुख पर्यटनस्थळे

साताऱ्यातील प्रमुख पर्यटनस्थळे:


कास पठार - विविध रंगांची, विविध आकारांची फुले येथे पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. सण-२०१२ मध्ये कास पठाराला "जागतिक वारसा" म्हणून संबोधले गेले आहे. जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून ओळखले जाते. पर्यटकांसाठी घाटाई फाटा येथे विनामूल्य वाहन स्थळ उपलब्ध आहे. वाहन स्थळापासून पुष्प पठारावर जाण्यासाठी बसची व्यवस्था आहे.


कास पठारावरील रस्त्यावर फिरण्यासाठी सह्शुल्क सायकलची व्यवस्था आहे. कास पठारावर घाटाई देवी,कास तलाव, वजराई धबधबा, सह्याद्री नगर पवन चक्की प्रकल्प, एकीव धबधबा, शिवसागर जलाशय इत्यादि प्रेक्षणीय स्थळे आहेत.


ठोसेघर- प्रसिध्द धबधबा आहे.सातारा शहरापासून ३६ कि.मी.अंतरावर हा धबधबा आहे.पावसाळ्यामध्ये या धबधब्याला भेट म्हणजे एक सुखद रोमांचकारक अनुभव आहे. विविध भागातून पर्यटक इथे भेट देतात व धबधब्याचा आनंद मनमुराद लुटतात.


चाळकेवाडी-पवन उर्जा प्रकल्पहे ठिकाण समुद्र सपाटीपासून सुमारे ३००० फुट उंचीवर आणि १०० स्क्वेअर कि.मी. परिसरात विस्तृत असलेले पठार आहे.पवन  उर्जा निर्मिती करण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे.जवळपास ५०० हून अधिक उर्जा निर्मिती करणारे टॉवर्स इथे उभारलेले आहेत. अत्यंत प्रेक्षणीय असे हे ठिकाण आहे.कास तलाव (लेक)

समुद्र सपाटीपासून सुमारे ३५०० फुट उंच असलेल्या कास पठाराची निर्मिती सन १८४४ मध्ये झाली. कास तलाव हा सातारा शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारा मुख्य स्त्रोत आहे. कासचे सातारा शहरापासून अंतर २२ कि.मी.आहे. हे तरुण पिढीला आकर्षित करणारे स्थळ असल्याने सहलीसाठी तरुणाईची येथे गर्दी असते.



महाबळेश्वर- हे प्रसिध्द थंड हवेचे ठिकाण आहे.पावसाळा ऋतू(जून ते सप्टेंबर) सोडून इतर सर्व वर्षभर पर्यटक येथे थंड वातावरणाचा आनंद घेण्यासाठी येत असतात.वेण्णा तलावातील बोअटींगचा अनुभव घेऊन घोडेस्वारी करत महाबळेश्वरची पर्यटन सफारी पूर्ण केली जाते.


अजिंक्यतारा - सातारामधील अजिंक्यतारा किल्ला ११ शतकात दुसरा भोज राजाने बांधला. या किल्ल्यावर आयुर्वेदिक व दुर्मिळ वनस्पती आहेत .


सज्जनगड - रामदासस्वामी यांची समाधी आहे.


जरंडेश्वर - हनुमान मंदिर आहे.येथे जाण्यासाठी तीन बाजूंनी रस्ता आहे.एका बाजूने मंदिरापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या केलेल्या आहेत.त्यामुळे ट्रेकिंग करण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे.


औंध -येथील संग्रहालय प्रसिध्द आहे येथे यमाई देवीचे मंदिर प्रसिध्द आहे


शिखर शिंगणापूर- महाराष्ट्राचे कुलदैवत शंभू महादेव मंदिर आहे. जवळच गुप्तलिंग आहे पावसाळ्यात येथील दृश्य पर्यटकांना आकर्षित करते.


पाचगणी- टेबललेंड प्रसिध्द आहे. येथे नामांकित निवासी शाळा आहेत.


वाई - येथिल महागणपती मंदिर प्रसिद्ध आहे.


भिलार- हे पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे.येथे येणाऱ्या प्रत्येक वाचन प्रेमींसाठी गावातील प्रत्येक घरात वाचनासाठी स्वतंत्र खोली आहे आणि विविध विषयावर पुस्तके उपलब्ध आहेत.


प्रतापगड- येथे शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला .


मेणवली- नाना फडणीस यांचा राजवाडा प्रसिध्द आहे.


मायणी- पक्षी अभयारण्य आहे.


नागनाथवाडी - येथिल नागनाथमंदिर प्रसिध्द आहे.


शेरी - पाटखळ माथ्यापासून काही अंतरावर -बारा मोटेची विहीर प्रसिद्ध आहे.


तापोळा- नौकाविहार


मांढरदेवी -वाई येथून जवळपास काळूबाई देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे .या देवीलाच मांढऱदेवी असे म्हणतात.


गोंदवले- येथे गोंदवलेकर महाराज मंदिर प्रसिध्द आहे.


कराड - प्रीती संगम हे ठिकाण पर्यटना साठी प्रसिद्ध आहे.कराड शहर हे कृष्णा आणि कोयना नदीच्या संगमावर वसलेले आहे. कृष्णा आणि कोयना नदीच्या संगमावर कृष्णा नदीच्याकाठावर कै. यशवंतराव चव्हाण (भारताचे माजी उप पंतप्रधान) यांची समाधी आहे. येथे कृष्णामाई मंदिर, उंच मिनार इ. प्रसिद्ध ठिकाणे आहेत. कराड शहरालगतच प्राचीन बुद्धकालीन लेण्या असलेला आगाशिवचा डोंगर आहे.


पुसेगाव - संत सेवागिरी महाराज मंदिर


नेर - सुंदर तलाव व येरळा नदी


पाटण- कोयनानगर धरण परिसर


कासतलाव- पर्यटना साठी प्रसिध्द आहे नौका विहार व तीन नदयाचा संगम या ठिकाणी विलोभनीय व निसर्गरम्य परिसर असल्यामुळे पर्यटकांना आकर्षित करतो.


समर्थ घळ- या ठिकाणी समर्थ रामदास स्वामी ध्यान , चिंतन करत.


कास तलाव - सातारा शहरासाठी या धरणाच्या पाण्याचा पिण्यासाठी उपयोग करतात.


वजराई
. येथील निसर्गरम्य परिसर हे पावसाळ्यातले मुख्य आकर्षण आहे. ट्रेकर्ससाठी हा भाग नंदनवन समजला जातो. वजराई धबधब्याच्या पायथ्यापर्यंतचा मार्ग उत्कंठापूर्ण आहे, पण पावसाळ्यामध्ये तो धोकादायक असू शकतो. या भागात मोठ्या प्रमाणात जळवा आहेत.

वासोटा - वासोट्याचे नाव महाराजांनी व्याघ्रगड असे ठेवले. याच्या दुर्गमतेबद्दल पेशवाईत सुद्धा नोंद आहे. शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याचा वापर 'तुरुंग' म्हणून केला जात असे. याचे कारण तेथील निर्जन व घनदाट असे अरण्य. पूर्वी तेथे वाघ, बिबट्यांसारखे प्राणीही होते. हे प्राणी अजूनही आहेत.



No comments