संख्या मालिका (बुद्धिमत्ता चाचणी)
संख्या मालिका (बुद्धिमत्ता चाचणी) विषयी संपूर्ण माहिती
कोणत्याना कोणत्या सुत्राने किंवा नियमाने तयार करण्यात आलेल्या संख्येच्या मालिकेला संख्यामालिका असे म्हणतात. संख्यामालिकेचे वैशिष्ट असे की, यामधील सर्व संख्या कोणत्यातरी सुत्राने एकमेकांशी बद्ध असतात. सर्वसाधारणपणे संख्यामालिकेमध्ये वर्गसुत्र, घनसुत्र, मूळसंख्या, नैसर्गिक संख्या यांचा उपयोग करून मालिका तयार केलेली असते.
उदा. 3, 5, 7, 11, 13, ——.
15
17
19
यापैकी नाही
स्पष्टीकरण :
ही संख्यामालिका मूळ संख्येची तयार झालेली आहे, मूळ संख्या ज्या संख्येला कोणत्याही संख्येने भाग न जाता त्याच संख्येने भाग जातो अशी संख्या. 13 नंतरची मूळ संख्या 17 आहे. यामुळे उत्तर 17 हे आहे.
उदा. 2, 5, 10, 17, —–.
24
25
26
यापैकी नाही
स्पष्टीकरण :
या संख्यामालिकेत n²+1 या सुत्राचा उपयोग करण्यात आला आहे. n = 1, 2, 3, — 17 नंतर पुढील संख्या 26 येते. यामुळे उत्तर 26 हे आहे.
उदा. 0, 1, 3, 6, 10, —— 21, 28.
13
15
17
18
स्पष्टीकरण :
या संख्यामालिकेमध्ये x + n या सुत्राचा उपयोग करण्यात आला आहे. यामुळे 10 नंतरची संख्या 15 ही आहे. यामुळे उत्तर 17 हे आहे.
उदा. 7, 14, 23, —– 47.
28
34
36
40
स्पष्टीकरण :
या संख्यामालिकेमध्ये n²+ विषम संख्या या सुत्राचा उपयोग करण्यात आला आहे. 2²+3 = 7, 3²+5 = 14, 4²+7 = 23, 5²+9 = 34. यामुळे उत्तर 34 हे आहे.
उदा. 2, 9, 28, 65, ——.
126
130
140
145
स्पष्टीकरण :
या संख्यामालिकेमध्ये n³+1 या सुत्राचा उपयोग करण्यात आला आहे. यानुसार रिकाम्या जागी 126 ही संख्या येते. यामुळे उत्तर 126 हे आहे.
उदा. 21 × 19 + 21 = ?
22×20
22×19
21×20
21×18
उत्तर : 21×20
क्लृप्ती :-
बेरीज असेल तर असामाईक संख्या 1 ने वाढवून, व वजाबाकी असेल तर असामाईक संख्या 1 ने कमी करून गुणाकार करावा.
नमूना दूसरा –
उदा. 12×18+12×12 =?
72
384
360
480
उत्तर : 360
स्पष्टीकरण :-
12(18+12) = 12×30 = 360
7×5+7×3 =? 7×(5+(3) = 7×8 = 56
7×5+7×3 =? 7×(5-(3) = 7×2 = 14
उदा. 28×25 =?
675
700
527
650
उत्तर : 700
स्पष्टीकरण :-
12×25
= 1200÷4
= 300; 16×125
= 16000÷8
= 2000
क्लृप्ती :- दिलेल्या संख्येला 25 ने गुणायचे असेल ; तर त्या संख्येवर दोन शून्य देऊन 4 ने भागणे व संख्येला 125 ने गुणणे म्हणजे, त्या संख्येवर तीन शून्य देऊन 8 ने भागणे.
:: 28×25
= 2800/4
= 700
No comments